Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पावसाळ्यात वाहने जपून चालवा अन् स्वत:ची अन् इतरांची काळजी घ्या', अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 11:16 IST

अभिनेत्री जुई गडकरी हिनं चाहत्यांना मोलाचा सल्ला देणारी पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे.  

पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात अनेकदा रस्ते खराब होत असतात. या दिवसात अनेक अपघात झाल्याचे पाहायला मिळतात. अशात या दिवसात गाडी चालवणे जरा कठीण आणि धोकादायक असतं. यातच अभिनेत्री जुई गडकरी हिनं चाहत्यांना मोलाचा सल्ला देणारी पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे.  तिच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने पावसाळ्यात गाड्या चालवताना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

अभिनेत्री जुईनं लिहलं, 'अगदी काल परवापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होतं ना. मला वर्षानुवर्षे त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा. पण निदान त्यामुळे ट्राफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा.  घरी उशिरा जात असाल पण, सुखरुप पोहोचत होता. तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची??? माझी वाट बघणारं घरी कोणी नाही. पण तुमची वाट बघणारे आहेत. काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा. पावसाळा येतोय. पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्किड होतात. तर स्वत:ची आणि इतरांची पण काळजी घ्या.तुमचाच (लाडका) रस्ता!", अशी पोस्ट जुईने शेअर केली आहे. 

पुढे तिनं सांगितलं की, 'गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुन्नं झालंय. त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे. तो गेले ७-८ दिवस कोमात आहे. प्लीज गाड्या हळू चालवा, असं आवाहन जुईनं केलं आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. जुई ही सध्या 'पुढचं पाऊल' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.  कर्जतच्या या लेकीने कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

टॅग्स :जुई गडकरीसेलिब्रिटीपाऊसअपघात