Join us

ती माझी गर्लफ्रेंड नाही! फोटोत दिसणाऱ्या मुलीबाबत 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाला- "मला मेसेज करून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:01 IST

चैतन्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देतो.

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील टीआरपीच्या शर्यतीत असलेली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. 'ठरलं तर मग'मधील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्याबरोबरच अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या चैतन्यलादेखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 

चैतन्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देतो. चैतन्यने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्याने "बाँड...एक चांगलं नातं...हेच आमच्याकडे आहे", असं कॅप्शन दिलं होतं. त्याबरोबरच पुढे "ही माझी गर्लफ्रेंड आहे की नाही हे विचारण्यासाठी मेसेज करू नका. हे प्री वेडिंग शूट नाही आणि मी तेवढा भाग्यवानही नाही", असंही त्याने म्हटलं होतं. 

तरीदेखील पोस्ट पाहून चाहत्यांनी मेसेज केल्याने चैतन्यला पुन्हा पोस्टवर कमेंट करत स्पष्टीकरण द्यावं लागलं. "मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत...१. ही जागा खूप छान होती. नक्की भेट द्या. आणि २. प्लीज कॅप्शन वाचा. ती माझी गर्लफ्रेंड नाही", अशी कमेंट चैतन्यने त्याच्या पोस्टवर केली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाहमराठी अभिनेता