Join us

'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; TRP न मिळाल्यामुळे जाणार ऑफएअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 13:48 IST

Tv serial: या मालिकेला  TRP मिळत नसल्यामुळे ती बंद होणार असून तिच्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठीवर सध्या अनेक मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यात काही मालिका लोकप्रिय ठरत आहेत. तर, काही मालिकांना उत्तम कथानक असूनही TRP मिळत नाहीये. त्यामुळे आतापर्यंत अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यात अलिकडेच लोकमान्य ही मालिका लवकरच संपणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्येच आता या मालिकेनंतर आणखी एक मालिका बंद होणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच छोट्या पडद्यावर '36 गुणी जोडी' ही मालिका प्रदर्शित झाली होती. आता ही मालिका रंजक वळणावर पोहोचली होती. मात्र, असं असूनही ती लवकरच संपणार आहे. या मालिकेला  TRP मिळत नसल्यामुळे ती बंद होणार असून तिच्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचं कथानकही पुढे ढकलण्यात आलं आहे. 

ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवर लवकरच 'सारं काही तिच्यासाठी' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन सख्ख्या बहिणींवर आधारित ही मालिका असून त्यांची ताटातूट कशी होते, पुढे त्यांच्या नात्यात काय होतं हे या मालिकेत दाखवलं जाणार आहे. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत ही जोडी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत अभिनेता अशोक शिंदेदेखील झळकणार आहेत.

दरम्यान, या नव्या मालिकेत दक्षता जोईल आणि ऋचा कदमदेखील काम करणार आहेत. खुशबू सध्या आई कुठे काय करते या मालिकेत वीणा ही भूमिका साकारत आहे. परंतु, लवकरच ती या मालिकेतून काढता पाय घेणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी