Join us

झी मराठीची नवी मालिका 'इच्छाधारी नागीण', सूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात काय निवडेल 'नागकन्या'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:40 IST

काही महिन्यांपूर्वीच झी मराठीकडून 'इच्छाधारी नागीण' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता या मालिकेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच झी मराठीकडून 'इच्छाधारी नागीण' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता या मालिकेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. 'इच्छाधारी नागीण' मालिकेचा नवा प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांची मालिकेबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

या प्रोमोमध्ये माणसांच्या जगापलिकडे राहणाऱ्या नागदेवतांचं जग दिसत आहे. त्यांचा नागमणी एक व्यक्ती चोरून घेऊन जात असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच त्या नागदेवतांचा विश्वासघात केल्याचं दिसत आहे. याचा बदला घेण्यासाठी नागकन्या माणसांच्या दुनियेत येत असल्याचं प्रोमोत दिसत आहे. पण, त्याबरोबरच एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सूड घेण्यासाठी आलेली नागकन्या प्रेमात पडते. आता सूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात नागकन्या काय निवडेल? मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

अनेकांनी या मालिकेसाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी मालिकेत नागिणीच्या भूमिकेसाठी काही अभिनेत्रींचीही नावं सुचवली आहेत. 'इच्छाधारी नागीण' या मालिकेत कोणते कलाकार असणार? इच्छाधारी नागीणची भूमिका कोण साकारणार? याबाबत अद्याप कोणतीही अपडेट नाही. ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक असल्याचंही म्हटलं जात आहे. लवकरच ही मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे.  

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकार