Join us

‘तारक मेहता मालिकेसाठी बापूजींना मिळते इतके मानधन,आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 13:06 IST

अमित भट्ट यांचे मालिकेनंतर आयुष्यच पालटले. यापूर्वी त्यांनी ‘खिचडी’ आणि ‘एफआयआर’ मालिकेतही काम केलं आहे.

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे.  दया जेठालाला, भिडे पोपटलाल प्रमाणे बापूजीचे पात्र साकारणारे अमित भट्ट  सुरूवातीपासूनच 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहेत.

अमित भट्ट यांचे मालिकेनंतर आयुष्यच पालटले. यापूर्वी त्यांनी ‘खिचडी’ आणि ‘एफआयआर’ मालिकेतही काम केलं आहे. मात्र अमित भट्ट यांना ख-या अर्थाने 'तारक मेहता' याच मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवून दिली आहे. आज घराघरात अमित भट्ट जेठालालचे बापूजी म्हणून प्रसिद्ध आहेत.

प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन मिळत, जितकी त्याची लोकप्रियता तितके जास्त त्याचे मानधन असते हेच समीकरण या इंडस्ट्रीत चालते. अमित भट्ट यांना त्यांच्या भूमिकेसाठी एका एपिसोडप्रमाणे५० ते ६० हजार रुपये इथके मानधन मिळते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील सगळेच कलाकार लोकप्रिय आहेत. मालिकेतील अभिनेत्रींनाही चांगलेच मानधन दिले जाते.

प्रत्येकजण मानधनाच्या बाबतीत समानता ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सद्यस्थितीत पाहायला मिळतंय. एकुणच काय तर तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हेच अमित भट्ट यांनीही सिद्ध   करून दाखवलंय. 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजींनी शेअर केला मजेदार व्हिडीओ; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट!

कोरोना व्हायरसमुळे  लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. अशा परिस्थितीमध्ये अनेक कलाकारांचे घरात काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यामध्ये अमित भट्ट यांचा देखील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. पत्नी क्रुति भट्टसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनीही लाईक्स कमेंटस देत आपल्या प्रतिकीया दिल्या होत्या.

हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडीओमध्ये त्यांची भांडी घासण्यावरुन भांडणे होतात तसेच ते पत्नीला मजेशीर अंदाजात घरात झाडूने मारताना दिसत आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा