‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजींनी शेअर केला मजेदार व्हिडीओ; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:59 PM2020-05-03T17:59:13+5:302020-05-03T18:00:05+5:30

बापूजीची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचा पत्नी क्रुति भट्टसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत.

Funny video shared by Bapuji in ‘Tarak Mehta Ka Ulta Chashma’; You too will be overwhelmed! | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजींनी शेअर केला मजेदार व्हिडीओ; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट!

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजींनी शेअर केला मजेदार व्हिडीओ; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट!

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक कलाकारांचे घरात काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजीची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचा पत्नी क्रुति भट्टसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडीओमध्ये त्यांची भांडी घासण्यावरुन भांडणे होतात तसेच ते पत्नीला मजेशीर अंदाजात घरात झाडूने मारताना दिसत आहेत.

बापूजीने हा व्हिडीओ मजेशीर अंदाजात बनवला आहे. त्या दोघांमध्ये कोणतेही वाद किंवा भांडणे नाहीत. उलट अमित आणि त्यांची पत्नी लॉकडाउनचा संपूर्ण वेळ एकमेकांसोबत आनंदात घालवताना दिसत आहेत. त्यांनी दरम्यान अनेक टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील अभिनेता तन्मय वेकारियाच्या इमारतील कोरोनाग्रस्त सापडला होता. त्यामुळे त्याची इमारत सील करण्यात आली होती. याची माहिती त्यांनी स्वत: दिली होती. ‘होय, बातमी खरी आहे. इमारतीतील तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने सील करण्यात आली आहे. मी सुद्धा १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहत आहे’, असे तन्मयने सांगितले होते.

Web Title: Funny video shared by Bapuji in ‘Tarak Mehta Ka Ulta Chashma’; You too will be overwhelmed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.