प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस १७' फेम अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अनुरागने काही दिवसांपूर्वी युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचही म्हटलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर लाइव्ह स्ट्रीम करताना अनुरागच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच अनुरागची पत्नी रितिका चौहान हिने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे.
रामनवमीच्या दिवशी शुक्रवारी(२७ मार्च) रितिकाची डिलिव्हरी झाली. रितिकाने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत याबाबत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अनुराग आणि रितिकाला मुलगा झाला की मुलगी, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अनुराग आणि रितिकाला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुराग आणि रितिकाने ३० एप्रिल २०२५ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर एका वर्षांतच ते दोघेही आईबाबा झाले आहेत. एकीकडे अनुराग हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत असताना दुसरीकडे त्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे.
अनुरागने आई, वडील आणि भावावर गंभीर आरोप केले होते. पत्नीही सोडून गेल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर रितिकाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यामागचं नेमकं सत्य काय आहे? हे लवकरच सांगणार असल्याचं म्हटलं होतं. अनुराग आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. अनुरागने केलेले आरोपही खोटे असल्याचं त्याच्या भावाने सांगितलं होतं.
Web Summary : YouTuber Anurag Dobhal, injured in an accident and hospitalized, became a father. His wife, Ritika Chauhan, gave birth to their first child on Ram Navami. Despite family disputes, the couple welcomed their baby after a year of marriage.
Web Summary : यूट्यूबर अनुराग डोभाल दुर्घटना में घायल हो गए और अस्पताल में भर्ती हैं, इस बीच पिता बने। उनकी पत्नी, रितिका चौहान ने रामनवमी पर अपने पहले बच्चे को जन्म दिया। पारिवारिक विवादों के बावजूद, दंपति ने शादी के एक साल बाद अपने बच्चे का स्वागत किया।