Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'मधून बाहेर का यावंसं वाटत होतं? योगिता खरं कारण सांगत म्हणाली- "निक्की, अरबाज, जान्हवी ज्या पद्धतीने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:47 IST

बिग बॉस मराठीच्या घरातून योगिताला बाहेर का पडावंसं वाटत होतं, याचा खुलासा तिने केलाय (yogita chavan, bigg boss marathi 5)

योगिता चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर गेली. गेल्या आठवड्यात दोन एविक्शन झाले. त्यापैकी निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोघांना घराबाहेर जावं लागलं. योगिता घराबाहेर गेल्याने सर्वांना चांगलाच धक्का बसला. योगिताने घराबाहेर आल्यावर अनेक गोष्टींबद्दल मत व्यक्त केलं. योगिताने बिग बॉसमध्ये असताना दोन वेळा तिला बाहेर पडायचंय, मानसिक त्रास होतोय, असं सांगितलं होतं. यामागचं कारण काय होतं, याचा खुलासा योगिताने केलाय. 

योगिताला घराबाहेर का पडावंसं वाटत होतं?

योगिताने घराबाहेर आल्यावर एका मुलाखतीत तिला घराबाहेर का पडावं वाटत होतं याचा खुलासा केलाय. योगिता म्हणाली, "टास्कमध्ये  खूप ओढाताण होते. कुठेही कसंही टच केलं जातं. असे छोटे मोठे प्रसंग घडले होते. मी कधीही वूमन कार्ड वगैरे अशा प्लॅटफॉर्मवर वापरणार नाही. कारण माझी फॅमिली बघतेय. त्यामुळे मी काहीतरी असं करणार नाही. निक्की-अरबाज-जान्हवी या तिघांची चर्चेची पद्धतच खूप वेगळी आहे. अशी पद्धत मी कधी बघितली नाही. अनुभवली नाही. आता हे बाहेर दिसलं नाही. पण मी ते अनुभवलंय की त्याबद्दल काय काय बोललं जातं. ते मला नाही झेपलं. मला त्याचा खूप त्रास होत होता. कारण मी अशी व्यक्ती आहे की हे सर्व नवीन होतं माझ्यासाठी. त्रास वगैरे होणार ठीक आहे. पण हे सर्व insulting होतं. अपमानास्पद होतं."

योगिता तीन आठवड्यात पडली घराबाहेर

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून या आठवड्यात योगिता चव्हाण घराबाहेर आली. तिसऱ्या आठवड्यात चांगला खेळ खेळूनही कमी मतं मिळाल्याने योगिता चव्हाणला घराबाहेर यावं लागलं. योगिताचं एविक्शन सर्वांसाठी शॉकिंग होतं. योगिताने अंकिताला कॅप्टनसी जिंकण्यासाठी चांगलीच मदत केली होती. याशिवाय तिसऱ्या आठवड्यात ती निक्कीला भिडली होती. ज्यामुळे तिचं रितेशने कौतुकही केलं. पण योगिताचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठी