Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपूडा, होणार नवरा आहे लोकप्रिय दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:14 IST

लोकप्रिय अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे.

सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकत आहेत.  यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री येशा रुघानी हिने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. येशा रुघानी हिने 'रब से है दुआ' या मालिकेचा दिग्दर्शक नरिंदर सिंगसोबत साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर येशा व नरिंदर या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

येशा रुघानी हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. येशा आणि नरिंदर यांचा साखरपूडा हा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. येशाने सुंदर लेहेंगा चोळी परिधान केलीहोती, तर नरिंदर पांढऱ्या कुर्ता-पायजम्यात दिसला. येशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मातीचे भांडे दिसत असून त्यावर दोघांची नावे आणि साखरपुड्याची तारीख लिहिलेली आहे. हे फोटो शेअर करताना त्यांनी "११:११ वाजता, आम्ही कायमचे एक झालो" असे सुंदर कॅप्शन दिले आहे.

नरिंदर सिंग हा टीव्ही सृष्टीतील नामांकित दिग्दर्शक आहे. त्यानं 'रब से है दुआ' सोबतच 'जमाई नंबर १' आणि 'सुमन इंदोरी' सारख्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. येशा आणि नरिंदर यांची पहिली भेट 'रब से है दुआ'च्या सेटवरच झाली होती. एकत्र काम करता करता दोघांमध्ये प्रेम जडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Yesha Rughani secretly engaged to director Narinder Singh.

Web Summary : Actress Yesha Rughani, known for her work in television, recently got engaged to Narinder Singh, the director of 'Rab Se Hai Dua'. The couple shared photos from their simple ceremony, with a caption: "11:11, We are one forever". Narinder has also directed shows like 'Jamai Number 1'.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन