Join us

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशीच्या कुटुंबातील 'या' व्यक्तीचे झाले निधन, शेअर केली इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:55 IST

आपल्या भावनांना तिने वाट मोकळी करुन दिली आहे.

प्रसिद्ध टीव्ही मालिका ये रिश्ता क्या कहलाता है मधील नायराची भूमिका साकारणाऱ्या शिवांगी जोशीच्या आजोबांचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.  

शिवांगी जोशीने इन्स्टाग्राम स्टेटसवर लिहिले की, दुर्दैवाने काल मी आजोबा तुम्हाला गमावले.. 'मला आशा आहे की ते हसत राहतील आणि आकाशातून आम्हाला बघतील.'

शिवांगी जोशी लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत घरी 'देहरादून'मध्ये आहे.  काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या कुटुंबीयांसोबत वाढदिवस सेलिब्रेट केला.

शिवांगी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हि़डीओ ती शेअर करत असते. शिवांगी 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील नायरा या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. प्रेक्षकांना तिची आहे मोहसिनची जोडी खूपच भावली. या शिवाय ती बेगूसराय, लव बाई चान्स सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. त्याचसोबत ती म्युझिक व्हिडीओमध्ये पण दिसली आहे. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता है