Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता मोहसिन खानला झाला हा आजार, सोशल मीडियावर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:35 IST

अभिनेता मोहसीन खानच्या चाहत्यांना हे वृत्त वाचून त्याची चिंता वाटेल.

छोट्या पडद्यावरील अभिनेता मोहसीन खानच्या चाहत्यांना हे वृत्त वाचून त्याची चिंता वाटेल. मोहसीनला डेंग्यू झाला असून त्याने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. मोहसीनने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत कार्तिक गोएंकाची भूमिका साकारतो आहे. या मालिकेतील कार्तिक व नायराची जोडी प्रेक्षकांना खूप भावते आहे.

मोहसीनने ट्विट करत सांगितलं की, मला डेंग्यू झाला आहे. बराच काळ बाहेर राहत असाल तर सावधान रहा. लवकर बरा होईन, इंशाअल्लाह.

मोहसीनचे ट्विट पाहिल्यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर तो बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. एका युजरनं लिहिलं की, लवकर बरा हो. तू लवकर बरा होशील, अशी आशा आहे. स्वतःची काळजी घे मोहसीन.

दुसऱ्या युजरनं लिहिलं की, लवकर बरा हो. आम्हाला माहित आहे की तू खूप स्ट्राँग आहेस आणि लवकरच बरा होशील.

मोहसीन खानने त्याच्या करियरची सुरूवात २०१४ साली लव बॉय चान्स मालिकेतून केली होती. त्यानंतर तो कित्येक मालिकेत झळकला आहे.  'मेरी आशिकी तुम से ही', 'निशा और उसके कजिन्स', 'प्यार तूने क्या किया', 'ड्रीम गर्ल: एक लड़की दीवानी सी' या मालिकेत त्याने काम केलं आहे.

सध्या तो  'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत काम करतो आहे. या मालिकेनं नुकतेच तीन हजार भाग पूर्ण केले आहेत.

 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस