टीव्ही इंडस्ट्रीतून एक गुडन्यूज आली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता बाबा झाला आहे. लग्नानंतर ६ वर्षांनी अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. सोशल मीडियावर ही गुडन्यूज अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. टीव्ही अभिनेता रोहित पुरोहितला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. रोहितच्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
रोहित पुरोहितने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. सोमवारी (१५ सप्टेंबर) रोहितच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं. "तुमचं प्रेम, समर्थन आणि आशीर्वाद यासाठी धन्यवाद" असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी रोहितचं अभिनंदन करत त्याला नव्या जर्नीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
रोहित आणि शीनाने २०१९मध्ये लग्न करत संसार थाटला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आईबाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. एका मालिकेच्या सेटवर रोहित आणि शीना भेटले होते. त्यानंतर काही काळ डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते आईबाबा झाले आहेत.