Join us

बिग बॉस मराठी 2 : बिग बॉस शिवानी आणि वीणाला दाखवणार का बाहेरचा रस्ता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 13:57 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले. या टास्क दरम्यान घरामध्ये खूप क्लेश, हातापायी आणि भांडण झाली.

ठळक मुद्देशिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमकी बरोबरच एकमेकांवर त्यांनी हात देखील उचलले.शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले. या टास्क दरम्यान घरामध्ये खूप क्लेश, हातापायी आणि भांडण झाली. सदस्यांनी एकमेकांचे कपडे, सामान उधळून लावले. प्रत्येक सदस्य आपल्या टीमला टास्कमध्ये जिंकवण्याच्या मागे होता. परंतु यामध्ये सदस्य बिग बॉसच्या घराच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसले. वेळोवेळी बिग बॉस यांनी ताकीद देऊन देखील पूर्ण टास्कमध्ये सदस्यांनी हे सुरूच ठेवले. समंजस आणि सुज्ञ सदस्यांकडून अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन होणे अनपेक्षित आहे. याच चोर बाजार या टास्क दरम्यान काल शिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमकी बरोबरच एकमेकांवर त्यांनी हात देखील उचलले.

बिग बॉसच्या घरात मारहाणी करणे अथवा कुठल्याही प्रकारची हिंसा अमान्य आहे हे सदस्यांना माहिती असून देखीलही त्यांचा रागावर ताबा नसल्याने हे कृत्य शिवानी आणि वीणाकडून घडले. आता बिग बॉस या कृत्यावर घेणार कठोर निर्णय हे नक्की. बिग बॉसच्या घरातील नियमांची पूर्णपणे कल्पना असूनही या दोघींनी हिंसक कृत्य या टास्क दरम्यान केले. या दोघींनी नियम तोडले आणि त्याचे समर्थन देखील केले. अशा वागण्यातून या दोघींची अखेळाडू वृत्ती दिसून येते आणि अशा प्रकारची हिंसा सुज्ञपणाच्या व्याख्येत मोडत नाही असे बिग बॉस यांनी दोघींनाही निक्षून सांगितले. अशा प्रकारच्या कोणत्याही घटना बिग बॉसच्या घरात घडू नये अथवा अशा घटना घडण्यासाठी त्याला चालना मिळू नये म्हणून बिग बॉसनी याससंदर्भात कठोर निर्णय सुनावला आणि तो म्हणजे शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र आहेत. बिग बॉस च्या या निर्णयाने सगळ्या सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीशिवानी सुर्वेवीणा जगताप