Join us

'बिग बॉस'च्या घरात प्रणित हाटेची एण्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:11 IST

Bigg boss marathi 3 : 'बिग बॉस मराठी ३'मध्ये प्रणित हाटे होणार सहभागी?

ठळक मुद्दे१९ सप्टेंबरपासून 'बिग बॉस मराठी 3' प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. लवकरच या शोचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या नव्या पर्वात कोणते नवे चेहरे झळकणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच  गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये अभिनेत्री गंगा म्हणजेच प्रणित हाटे सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आता या चर्चांवर गंगानेच पडदा टाकला आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिने 'बिग बॉस'मध्ये सहभाग होणार की नाही हे सांगितलं.

"बिग बॉस मराठी ३ मध्ये मी सहभागी होणार नाहीये. या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मला नक्कीच आवडेल. मात्र, शोच्या निर्मात्यांकडून मला त्याविषयी कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. प्रेक्षकांना सतत असं वाटतंय की मी या शोमध्ये सहभागी होणार आहे. परंतु, तसं अजिबात नाही. निदान यावेळी तरी मी या शोचा भाग नाहीये", असं प्रणितने सांगितलं.

गंगा म्हणजे प्रणित हाटे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या 'कारभारी लयभारी' या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून १९ सप्टेंबरपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात अभिनेता संग्राम साळवी, नेहा जोशी हे कलाकार सहभागी होणार असल्याचीदेखील चर्चा रंगली आहे. मात्र, अद्याप कोणत्याच कलाकाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. 

टॅग्स :बिग बॉस मराठी