Join us
Daily Top 2Weekly Top 5

दादा खोतांचा विरोध पत्करून निशी जाणार मुंबईला? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:49 IST

Sarakahitichyasathi: नुकतीच दादांनी निशीला कॉलेजला जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता तिच्यासमोर आणखी एक संकंट उभं राहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर सारं काही तिच्यासाठी ही मालिका सुरु झाली आहे. सुरुवातीला उमा आणि तिच्या बहिणी भोवती फिरणारी ही मालिका आता निशी आणि ओवी या मावस बहिणींभोवती फिरताना दिसत आहे. एकमेकांच्या मावस बहिणी असूनही या दोघी सख्ख्या बहिणींसारख्या राहतात. त्यामुळे एकमेकींच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वादळाचा त्या एकत्रपणे सामना करत आहेत. यामध्येच रघुनाथ खोत यांना निशीच्या बॅटमिंटन खेळण्याविषयीची माहिती मिळते ज्यामुळे ते तिचं कॉलेजला जाणं बंद करतात. त्यानंतर आता निशीसमोर आणखी एक संकंट उभं राहणार आहे.

दादा खोतांची नजर चुकवून निशी बॅटमिंटन खेळू लागली होती. मात्र, तिचं सत्य समोर आल्यानंतर दादांनी तिचं कॉलेजला जाणं बंद केलं होतं. परंतु, काही अटी घातल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा निशीचं कॉलेज सुरु केलं. मात्र, वडिलांच्या सांगण्यावरुन निशी तिचंय बॅटमिंटनचं स्वप्न विसरुन जाते हे नीरजला कळल्यानंतर तो नाराज होता. वडिलांच्या हट्टापायी तिने तिचं स्वप्न सोडून द्यावं हे त्याला मान्य नाही.  निशीने त्याला ना ना प्रकारे समजावल्यानंतरही तो निशीच्या घरी दादा खोतांना भेटायला जातो. इतकंच नाही तर तो त्यांना मुंबईला निशीला घेऊन जाण्याविषयीदेखील सांगतो ज्यामुळे तिच्यासमोर आता मोठं संकटं उभं राहिलं आहे.

लवकरच मुंबईमध्ये ट्रेनिंग कॅम्प होणार असून या कॅम्पचा फायदा निशीच्या भविष्यासाठी सुवर्णसंधीसारखा होणार आहे. त्यामुळे तिने ही संधी गमावू नये असं नीरजला वाटतं. त्यानुसार तो तिची समजूतही काढतो. विशेष म्हणजे निशी नीरजचं ऐकते आणि पहिल्यांदाच स्वत:साठी निर्णय घेते.

दरम्यान, पहिल्यांदाच स्वत:चा निर्णय स्वत: घेणाऱ्या निशीला श्रीनू साथ देईल का? मुंबईला जाण्यासाठी ओवी तिची मदत करेल का? निशीच्या या स्वप्नासाठी उमा रघुनाथरावांची समजूत काढू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमराठी अभिनेता