Join us

'मराठी इंडियन आयडल'च्या मंचावर होणार वाईल्ड कार्डची एंट्री, जाणून घ्या कोण आहे 'ती' स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:22 IST

Marathi Indian idol: येत्या आठवड्यात इंडियन आयडल मराठीमध्ये प्रेक्षकांना वाईल्ड कार्ड एंट्री पाहायला मिळणार आहे.

सोनी मराठी वाहिनी वरील 'इंडियन आयडल मराठी' (Marathi Indian idol) हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी सुरांचा हा मंच सोनी मराठी वाहिनी उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमात विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु झाली आहे. अजय-अतुल सारखी लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. येत्या आठवड्यात इंडियन आयडल मराठीमध्ये प्रेक्षकांना वाईल्ड कार्ड एंट्री पाहायला मिळणार आहे. त्याच बरोबर या आठवड्यात पाहुणी परीक्षक म्हणून बेला शेंडे देखील येणार आहे. ऑडिशन राउंडपासून बेला यांनी स्पर्धकांना पाहिलं आहे आणि आता पुन्हा बेला परीक्षक म्हणून या सुरांच्या मंचावर येतेय. 

मुंबईची देवश्री मनोहर हीची वाईल्ड कार्ड मध्ये निवड झाली आहे. लहानपणापासून गायनाचं शिक्षण घेतलेली देवश्री इंडियन आयडल मराठीच्या मंचावर आपली चुणूक दाखवणार आहे. पहिल्याच सादरीकरणाला देवश्रीने परीक्षकांची मनं जिंकत झिंगाट परफॉर्मन्स मिळवला आहे. देवश्रीच्या येण्याने आता ही स्पर्धा अजूनच रोमांचक होणार आहे. स्पर्धक सुद्धा अगदी कसून तयारी करत आहेत. प्रेक्षकांना देखील येत्या आठवड्यांमध्ये नवनवीन पद्धतीची गाणी ऐकायला मिळणार आहे. 

 

टॅग्स :इंडियन आयडॉलटेलिव्हिजन