Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय करते दत्तू मोरेची बायको?; 'या' क्षेत्रात काम करुन करतीये समाजकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 16:15 IST

Dattu more : दत्तूने आजवर कधीच त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या गाजलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय विनोदवीर म्हणजे दत्तू मोरे (dattu more) . आजवर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दत्तूने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. जस्ट मॅरिड असं म्हणत त्याने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तेव्हापासून नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये खासकरुन त्याच्या पत्नीची चर्चा रंगताना पाहायला मिळते.

दत्तूने आजवर कधीच त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत.

दत्तूने लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. त्यापूर्वी त्याने त्याच्या लग्नाविषयी कुठेही चर्चा होऊ दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोला पहिल्यांदाच पाहिल्यानंतर तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी आतुर झाले आहेत.

दरम्यान, दत्तूच्या बायकोचं  नाव स्वाती घुनागे असं असून ती एक डॉक्टर आहे. स्वाती स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि पुण्यात तिचं स्वत:चं क्लिनिकदेखील आहे. तसंच स्वातीला समाजकार्याची आवड आहे. त्यामुळे ती सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन