Join us

'जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला...', 'रंग माझा वेगळा' फेम दिपा उर्फ रेश्मा शिंदेची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:05 IST

Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

'रंग माझा वेगळा' (rang maza wegla) या मालिकेतून प्रचंड यश संपादन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (reshma shinde). या मालिकेत दिपाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. रेश्मा देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान आता रेश्मा शिंदेची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती कारच्या खिडकीतून डोके बाहेर काढून पाहत आहे. तिच्या डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. खरे तर तिचा हा लूक मालिकेतील लग्नाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. तिने हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला परमिशन मिळते, तेव्हा नवरी सासरी जाताना. रेश्मा शिंदेच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

टॅग्स :रेश्मा शिंदे