Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत काय लागणार पुष्पाच्या परीक्षेचा निकाल?, अभिनेत्री म्हणाली-परीक्षा देणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 16:38 IST

सोनी साबवरील पुष्पा इम्पॉसिबल या मालिकेने प्रेक्षकांची मन अल्पावधीतच जिंकली आहेत.

सोनी साबवरील पुष्पा इम्पॉसिबल या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. पुष्‍पाचा शिक्षण घेण्यासाठी चालू असलेला साहसी लढा असो, त्यासाठी तिच्‍या प्रियजनांनी तिला दिलेला पाठिंबा असो किंवा परीक्षा पास होऊन यशस्‍वी होण्‍याची संधी डावलून स्वतःचा पेपर बाजूला ठेवून शाळेतील आजारी पडलेल्या मुलांना मदत करण्याचं तिचं नि:स्‍वार्थ कार्य असो या सगळ्यामुळे मालिकेने प्रेक्षकांच्‍या मनात खूप उत्‍सुकता निर्माण केली आहे. 

परीक्षेच्‍या वेळी शाळेतील विद्यार्थी घाबरून जातात. हे पाहून पुष्‍पा चिंतीत होते. शाळेतील कॅन्टिनमधील पदार्थ खाऊन आजारी पडलेल्या मुलांना पुष्पा स्वतःचा पेपर बाजून ठेवून मदत करते. पण यामुळे तिच्‍या समस्‍यांमध्‍ये अधिक वाढ होते, कारण तिची पुन्हा परीक्षा देण्‍याच्‍या संधी आता निघून जाईल कि काय अशी भीती सगळ्यांना वाटतेय. पण पालक आता बोर्डकडे पुष्‍पाला परीक्षेसाठी दुसरी संधी देण्‍याची विनंती करतात. प्रकरण अधिक चिघळू नये म्‍हणून बोर्ड तिला परीक्षा देण्‍यास परवानगी देतात. परीक्षेचा निकाल देखील महत्त्वाचा असतो आणि पुष्‍पासाठी हे अधिक महत्त्वाचे आहे. 

 

पुष्‍पा परीक्षेमध्‍ये पास होईल का?पुष्‍पाची भूमिका साकारणारी करूणा पांडे म्‍हणाली, "आपणा सर्वांना माहित आहे की परीक्षा देणे अत्‍यंत खडतर असते, पण परीक्षेचा निकाल जाणून घेण्‍याच्‍या उत्‍सुकतेमधून अधिक तणाव येतो. तुमच्‍यासोबत तुमचे आई-वडिल देखील तणावग्रस्‍त असतात हे विसरून चालणार नाही. पुष्‍पाच्‍या प्रियजनांना देखील अशाच प्रकारचा तणाव येणार आहे. तसेच पुष्‍पासाठी ही सामान्‍य परीक्षा नाही. कदाचित ही तिच्‍या जीवनातील शेवटची परीक्षा असेल. म्‍हणून निकाल जाणून घेण्‍याच्‍या उत्‍सुकतेने अधिक तणाव आहे. या सीक्‍वेन्‍ससाठी शूटिंग करताना मला माझे शालेय दिवस आठवले. ’

टॅग्स :सोनी सबटिव्ही कलाकार