Join us

असं काय घडलं की, अंकिता आणि डीपीला निक्की-अभिजीतवर आलं हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:55 IST

Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी ५'च्या घरात सदस्यांचा कल्ला, राडा आणि गेम सुरूच आहे. या आठवड्यात जोडीचं बंधन या टास्कमुळे घरातील सदस्यांची नाती बदललेली पाहायला मिळाली.

'बिग बॉस मराठी ५' (Bigg Boss Marathi Season 5)च्या घरात सदस्यांचा कल्ला, राडा आणि गेम सुरूच आहे. या आठवड्यात जोडीचं बंधन या टास्कमुळे घरातील सदस्यांची नाती बदललेली पाहायला मिळाली. त्यामुळे टीमदेखील बदलल्या. पहिले चार आठवडे घरातील सदस्य एका वेगळ्या टीममध्ये होते. पण पाचव्या आठवड्यात मात्र या टीम बदलल्या गेल्या. आजच्या भागात डीपी दादा आणि अंकिताची बिग बॉस फिरकी घेताना दिसणार आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य 'बिग बॉस' काय आदेश देणार हे जाणून घेण्यासाठी जमले आहेत. दरम्यान निक्कीला प्रचंड थंडी वाजते. त्यानंतर अभिजीत त्याचं जॅकेट निक्कीला देतो. त्यामुळे डीपी दादा आणि अंकिताला मात्र हसू येते. त्यावर बिग बॉस म्हणतात,"धनंजय, अंकिता फार हसू येतंय... मलाही सांगा हा जोक". त्यावर डीपी दादा म्हणतो,"बिग बॉस काही जोक नव्हता". पुढे बिग बॉस म्हणतात,"मी सांगू का आपल्या मनात काय होतं...जाऊदे". 

निक्की करतेय अंकिताची नक्कल'बिग बॉस मराठी ५'च्या आजच्या भागात निक्की अंकिताची नक्कल करताना दिसणार आहे. निक्की अभिजीतला म्हणतेय,"काल अंकिता घाबरली होती. डीपीला सांगत होती नॉमिनेटेड आहे. मला तर म्हणत होती,"तुझ्या नॉमिनेशनची मला भीती वाटत नाही. नॉमिनेट झाल्यानंतर मी तिचं वेगळं रूप पाहिले. नॉमिनेशनमध्ये मी आणि अभिजीत असल्याने अंकिता घाबरली आहे". पुढे अंकिता येते आणि म्हणते,"मला बोलतेय...डायरेक्ट बोल की". तर निक्की, अभिजीत, वैभव, अरबाज यांच्यात जेवणावरुन भांडण झालेले आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी