Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे...' मालिकेत झळकली विशाखा सुभेदारची भाची, पोस्ट शेअर करत केलं कौतुक, म्हणते- "राधा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 14:41 IST

विशाखाची भाची राधा हिनेदेखील तिच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. विशाखाची भाची स्टार प्रवाहवरील लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली आहे. 

उत्तम अभिनय आणि विनोदशैलीच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून विशाखाने अभिनयाची छाप सोडली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे विशाखा प्रसिद्धीझोतात आली. या शोने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. हास्यजत्रेमुळे विशाखाच्या चाहत्या वर्गातही भर पडली. 

विशाखा सुभेदार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती आणि करिअर अपडेट्स ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. आताही तिच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशाखा सुभेदारने तिच्या भाचीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. विशाखाची भाची राधा हिनेदेखील तिच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. विशाखाची भाची स्टार प्रवाहवरील लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली आहे.  'आई कुठे काय करते' मालिकेत तिने अरुंधतीबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

विशाखाने राधाचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. भाचीसाठी खास पोस्ट लिहित विशाखाने तिचं कौतुक केलं आहे. "राधा...आई कुठे काय करते...माझी भाच्ची. आमची बाहुली", असं विशाखाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट करत कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान, विशाखा सध्या स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. तिने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम नृत्यांगणाही आहे. अनेकदा विशाखा तिचे डान्सचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार