Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आपण खूपच लवकर लग्न केलं, पण.'; 'या' गोष्टीमुळे हनिमूनला गेलेल्या विशाखाला वाटली होती खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 09:14 IST

Vishakha subhedar: वयाच्या २१ व्या वर्षी विशाखाने लग्नगाठ बांधली. त्यामुळे त्यावेळी कमी वयात लग्न झाल्यामुळे तिला एका गोष्टीची खंत वाटत होती.

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार (vishakha subhedar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी विशाखा उत्तम अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. विशाखाचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे तिचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. यामध्येच सध्या सोशल मीडियावर विशाखाच्या हनिमूनचा किस्सा रंगला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने हा किस्सा सांगितला होता.

गेली अनेक वर्षे मनोरंजन सृष्टी काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या विशाखा सुभेदार यांचे यजमान सुद्धा याच क्षेत्रात कार्यरत आहेत. १९९७ मध्ये विशाखा सुभेदार यांचे महेश सुभेदार यांच्याशी लग्न झाले. मध्यंतरी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विशाखा यांनी त्यांच्या हनिमूनचा किस्सा सांगितलेला.

वयाच्या २१ व्या वर्षी विशाखा सुभेदारने अभिनेता महेश सुभेदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे विशाखा आणि महेश यांचं लग्न झाल्यानंतर ते हनिमूनसाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत एक किस्सा घडला होता. हा किस्सा आजही विशाखाच्या लक्षात राहिला आहे. अलिकडेच विशाखाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये  वयाच्या कितव्या वर्षी तुमचं लग्न झालं? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने हा किस्सा सांगितला.

"मी २१ वर्षांची होते त्यावेळी माझं लग्न झालं. लग्नानंतर मी हनिमूनला गेले आणि तेव्हाच माझ्या पदवीच्या शेवटच्या वर्षाचा रिझल्ट आला होता. हा रिझल्ट पाहून मला असं वाटलं की आपण खूपच लवकर लग्न केलं आहे. पण, आता विचार केला तर असं वाटतं की माझं लवकरच लग्न झालं ते बरंच झालं. कारण, मी आता ४६ वर्षांची आहे आणि माझा मुलगा २३ वर्षांचा. आमच्या वयात फार अंतर नसल्यामुळे आमचं नातं खूप घट्ट आहे", असं विशाखा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझं आणि माझ्या मुलाचं नातं खूप मैत्रीपूर्ण आहे. तो मला मैत्रीण पण समजतो, आई पण मानतो, काही गोष्टी माझ्यापासून लपून ठेवतो. तर, काही गोष्टी हक्काने येऊन सांगतो.आमच्यात लटके भांडण देखील होतात."

दरम्यान, विशाखा सुभेदार सध्या त्यांच्या कुर्रर्रर्रर्र या नाटकामुळे चर्चेत येत आहे. तसंच ती शुभमंगल सावधान या मालिकेतदेखील काम करताना दिसून येत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारी विशाखा शुभमंगल सावधान या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे तिची ही भूमिकादेखील लोकप्रिय ठरत आहे

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी