Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : लग्नमंडपात वीणा जगतापच्या बहिणीची 'रॉयल एण्ट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:50 IST

Royal Entry video: वीणा जगतापच्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं असून या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ वीणाने शेअर केले आहेत.

ठळक मुद्देया लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओज सध्या चर्चेत येत आहेत

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. अनेक मालिका, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या वीणाच्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं असून या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओज सध्या चर्चेत येत आहेत. त्यातच वीणाने तिच्या बहिणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वीणाची बहीण आणि तिच्या पतीची रॉयल एण्ट्री होताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर वीणाच्या बहिणीच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वीणाची बहीण आणि तिचा पती दिमाखात लग्नमंडपात एण्ट्री करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी वीणाच्या बहिणीच्या चेहरा आनंद दिसून येत आहे.

दरम्यान, वीणाने यापूर्वी बहिणीच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अगदी मेंदी सोहळ्यापासून ते हळदी समारंभापर्यंत प्रत्येक क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. वीणा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून 'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळूबाई', 'बिग बॉस' यांसारख्या कार्यक्रमात झळकली आहे. 

टॅग्स :वीणा जगतापबिग बॉस मराठी