Join us

अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:56 IST

विकी जैनची झाली वाईट अवस्था, नक्की झालं काय?

टेलिव्हिजनवरची लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात. 'बिग बॉस'मुळे हे कपल आणखी व्हायरल झालं. बिझनेसमन असलेला विकी जैनही अभिनय क्षेत्रात आला. विकी आणि अंकिताचं मुंबईतलं आलिशान घर पाहून तर अनेकांना आश्चर्यच वाटलं. आता मात्र त्यांच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. विकी जैनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समर्थ जुरेलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही माहिती समोर आली. विकीला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

बिग बॉस फेम समर्थ जुरेलने रुग्णालयातून व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विकी रुग्णालयाच्या बेडवर आहे. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर आहे तर डाव्या हाताला सलाईन लावली आहे. त्याच्या बाजूला अंकिता उभी आहे आणि त्याची काळजी घेत आहे. व्हिडिओ समर्थ गंमतीत म्हणतो, 'दोन तासानंतर रुग्णालयाबाहेर भेटू'. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मोठ्या भावा लवकर बरा हो. मेरे टोनी स्टार्क'.

याशिवाय अभिनेत्री अशिता धवननेही विकीसोबतचा रुग्णालयातील फोटो शेअर करत लिहिले,"लवकर बरा हो, विकी. तुला अशा अवस्थेत बघून मला खूप वाईट वाटतंय. पण तुझ्या चेहऱ्यावरील स्माईल बघून कळतं की तू खरंच राजा आहेस. माझा स्ट्राँग भाऊ."

अंकिता आणि विकीचा मित्र संदीप सिंहने पोस्ट शेअर करत विकीला नक्की झालं काय ते सांगितलं आहे. विक्कीचा तीन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. हाताला काचांचे तुकडे लागले. त्याच्या हाताला ४५ टाके पडले आहेत. या सगळ्यात अंकिता त्याच्या मागे खंबीर उभी आहे.

विकीला नक्की झालंय काय हे मात्र समोर आलेलं नाही. अंकिता आणि विकी दोघंही शेवटचे 'लाफ्टर शेफ्स सीझन २'मध्ये दिसले. यानंतर त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं तेव्हा ते चर्चेत होते. तर आता थेट विकी रुग्णालयात असल्याचं समोर आलं आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकारहॉस्पिटल