Join us

"या मदमस्त तरुणीला माज असून..."; वर्षा उसगावकरांनी थेट 'बिग बॉस'कडे केली निक्की तांबोळीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:40 IST

वर्षा उसगावकरांनी अखेर सहन न होऊन निक्की तांबोळीची थेट बिग बॉसकडे तक्रार केली (varsha usgaonkar, bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात चांगलाच वाद रंगला. निक्की आणि वर्षा यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे घरातलं वातावरण चांगलंच तापलं. निक्की वर्षाताईंसोबत विविध विषयांवर वाद घालताना दिसतेय. वर्षा उसगावकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत असा वाद घालणं हे चुकीचं आहे, हे महाराष्ट्रातील अनेक लोकांचं म्हणणं आहे. अशातच काल निक्कीचं बोलणं सहन न झाल्याने वर्षा उसगावकर यांनी थेट बिग बॉसकडे तक्रार केलीय. 

निक्की मग्रूर मुलगी: वर्षा उसगावकर

काल बिग बॉसच्या घरात एक गोष्ट घडली. सदस्यांनी घरात नियम पाळले नाहीत म्हणून बिग बॉसने या आठवड्यात कोणालाच कॅप्टन केलं नाही. इतकंच नव्हे तर सदस्यांची पुढच्या आठवड्याची इम्युनिटीही काढून घेतली. यामुळे निक्कीने वर्षाताईंना दोष दिला. "तुमच्यामुळे झालंय हे सर्व, इतर लोक तुमची चाटत असतील", अशी भाषा निक्कीने वापरली. पुढे वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांचाही वर्षा उसगावकर यांच्यासोबत वाद झाला. त्यामुळे वर्षाताईंनी थेट बिग बॉसकडे निक्कीची तक्रार केली.

वर्षाताईंनी बिग बॉसकडे काय तक्रार केली?

निक्कीने वर्षाताईंना कडाडून विरोध केल्यावर त्या कॅमेराजवळ आल्या. वर्षा उसगावकर यांनी कॅमेरात बोलून बिग बॉसकडे तक्रार केली की, "निक्की नावाच्या मदमस्त तरुणीला. मग्रुर.. माज असलेली... काय भाषा आहे ही चाटणं वगैरे.. चाटायचं.. काय भाषा आहे ही बिग बॉस" अशा शब्दात वर्षा उसगावकर यांनी निक्कीची तक्रार केली. आज रितेश देशमुख निक्की-वर्षामध्ये झालेल्या वादावर काय प्रतिक्रिया देणार? तो निक्कीला झापणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठी