Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नवा गडी नवं राज्य'मधील 'हे' कलाकार आहेत रिअल लाइफ नवरा-बायको

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:13 IST

Real life couple: कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे रिअल लाइफमध्ये एकमेकांचे नवरा बायको आहेत.

झी मराठीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'नवा गडी नवं राज्य'. या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील एका जोडीची चर्चा होत आहे. मालिकेत नवरा-बायकोची भूमिका करणारे कलाकार खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती-पत्नी आहेत.

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे रिअल लाइफमध्ये एकमेकांचे नवरा बायको आहेत. अशाच एका कलाकार नवरा बायकोची जोडी 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. ही जोडी म्हणजे अभिनेता पंकज चेंबूरकर आणि मृणाल चेंबूरकर.

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत पंकज आणि मृणाल या जोडीने रमाच्या आई-वडिलांची भूमिका साकारली आहे. पंकज आणि मृणाल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार असून ते गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीशी जोडले गेले आहेत. मृणाल चेंबूरकर यांनी नाटकातून तसेच मालिकांमधून सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. 

दरम्यान, पंकज आणि मृणाल हे नवोदित कलाकारांसाठी अभिनयाचं वर्कशॉपही आयोजित करतात. मृणाल यांनी 'दिल्या घरी तू सुखी रहा', 'नवा गडी नवं राज्य' या मालिकांमध्ये काम केलं आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी