Join us

फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:30 IST

shalaka pawar :सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत दिसणारी मुलगी आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी या सोशल नेटवर्किंगच्या मदतीने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात अनेकदा हे कलाकार त्यांच्या बालपणीचे फोटो, व्हिडीओ शेअर करुन आपल्या जुन्या आठवणींनादेखील उजाळा देत असतात. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेतील एका अभिनेत्रीचा फोटो चर्चेत येत आहे. या अभिनेत्रीने तिच्या कॉलेज जीवनातील फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत दिसणारी मुलगी आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आई कुठे काय करते या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे.

'अरुंधती' आणि 'डॉ. अजितकुमार'चं आहे खास नातं; दोघांमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर व्हाल आश्चर्यचकित

फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शलाका पवार आहे. शलाका आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनघाच्या आईची भूमिका साकारत आहे.  शलाकाची या मालिकेतील भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.

आई कुठे काय करते: मायलेकीची बिंधास्त जोडी; अनघा आणि तिच्या आईचा डान्स पाहिलात का?

दरम्यान, शलाकाने यापूर्वी 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'गोठ', 'तू चांदणे शिंपीत जाशी', यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार