Join us

देवळात जाताना या टिव्ही अभिनेत्रीचा झाला अपघातात मृत्यू, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 12:47 IST

कन्नड टिव्ही अभिनेत्री शोभा यांचा रस्ते अपघाता दरम्यान मृत्यू झाला आहे. शोभा यांचा 'मगालु जानाकी' शोसाठी खूप लोकप्रिय आहे.

कन्नड टिव्ही अभिनेत्री शोभा यांचा रस्ते अपघाता दरम्यान मृत्यू झाला आहे. शोभा यांचा 'मगालु जानाकी' शोसाठी खूप लोकप्रिय आहे. या शोने त्यांना खूप लोकप्रियत्ता मिळवून दिली होती.  या शोचे दिग्दर्शक आणि फिल्ममेकर टीएन सीताराम यांनी फेसबुकवरुन पोस्ट शेअर करून ही दु:खद बातमी दिली. या अपघाताबाबत दु:ख व्यक्त करताना त्यांनी शोभा यांचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, शोभा एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या आणि नेहमीच हसत असायच्या. त्यांनी या मालिकेत आनंद बेालगुर यांच्या आईची भूमिका साकारली होती.

    आयबी टाईम्सच्या रिपोर्टनुसार, शोभा यांच्याशिवाय गाडीत अन्य चार जण होती त्यांच्यादेखील अपघातात मृत्यू झाला आहे. हे सगळे एका कारमध्ये कर्नाटकच्या चित्रादुर्गावरुन जात असताना त्यांच्या गाडीला एक ट्रकला टक्कर दिली. रिपोर्टनुसार,  गाडीत 8 लोक होते ज्यापैकी 5 लोकांचा मृत्यू झाला आहे बाकी तिघांना गंभीर रित्यादुखापत झाली आहे. सगळेजण बनाशंकरी मंदिरात जात होते ज्यावेळी बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यात हा अपघात झाला.     

टॅग्स :टिव्ही कलाकार