Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'साठी दारा सिंह ९ तास होते अन्न-पाण्यावाचून; हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं जीवाचं रान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:24 IST

Ramayan: रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अभिनेता दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे रामायण. रामानंद सागर यांची रामायण ही पौराणिक मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा या मालिकेचा विषय निघतो तेव्हा त्याच्याशी निगडीत अनेक किस्से समोर येतात. लवकरच बॉलिवूड अभिनेता रणबीर सिंह याचा रामायण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामुळे रामानंद सागर यांची रामायण ही मालिका पुन्हा चर्चेत आली आहे.

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अभिनेता दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे या भूमिकेला न्याय देण्यासाठी ते शक्य होईल तितके प्रयत्न करत होते. याविषयी रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं.

 ''रामायण या मालिकेत दारा सिंह यांनी केलेला हनुमानाचा लूक हा कोणत्याही प्रकारचा प्रोस्थेटिक्स नव्हता. ही सगळी मेकअपची कमाल होती. त्यांनी हा मेकअप करायला ३ ते ४ तास लागायचे.  दारा सिंह यांना सेटवर बसण्यासाठी एक खास स्टूल ही तयार करण्यात आला होता. कारण, हनुमानाची शेपटी लांब असल्यामुळे त्यांना त्याच गेटअपमध्ये सेटवर फिरावं लागायचं. ज्यामुळे अनेकदा त्यांना नीट बसताही यायचं नाही. त्यामुळे खास स्टूल त्यांच्या बसण्यासाठी तयार केला होता. ज्यामुळे शेपूट तुटणारही नाही आणि त्यांना नीट बसताही येईल'', असं प्रेम सागर म्हणाले.

पुढे ते सांगतात, ''एकदा का दारा सिंह यांच्या चेहऱ्यावर हनुमानाच्या लूकसाठीचा साचा बसला की त्यांना नीट जेवता यायचं नाही. शूटिंग सुरु व्हायच्या आधीच तीन तासपूर्वी त्यांचा मेकअप सुरु व्हायचा. त्यानंतर शुटिंग सुरु व्हायचं. या सगळ्यात एवढा वेळ जायचा की जवळपास ८ ते ९ तास त्यांना काहीही खाता-पिता येत नव्हतं. तरीदेखील ते ९ तास उपाशी राहून हे शूट पूर्ण करायचे. आणि, खरंच हे त्यांनी मालिकेसाठी केलंलं मोठं समर्पण होतं.''

English
हिंदी सारांश
Web Title : Dara Singh's 9-Hour Fast for Hanuman Role in 'Ramayan'

Web Summary : Dara Singh dedicated himself to his role as Hanuman in 'Ramayan', enduring a three-hour makeup process and a nine-hour fast during shooting. He even had a special stool made to accommodate his tail, highlighting his commitment.
टॅग्स :टेलिव्हिजनरामायणदारा सिंगसेलिब्रिटीटिव्ही कलाकार