Join us

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर शहनाज गिलने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज, किंमत आहे इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:44 IST

अक्षय्य तृतीयेला अनेक जण नवीन गाडी, घर किंवा सोन्याच्या वस्तूंची खरेदी करतात. हा शुभ दिवस गाठत अभिनेत्री शहनाज गिलनेही नवी कोरी गाडी घरी आणली आहे. 

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या हिंदू धर्मातील अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी ३० एप्रिल २०२५  रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेला अनेक जण नवीन गाडी, घर किंवा सोन्याच्या वस्तूंची खरेदी करतात. हा शुभ दिवस गाठत अभिनेत्री शहनाज गिलनेही नवी कोरी गाडी घरी आणली आहे. 

टीव्ही अभिनेत्री शहनाज गिल कायमच चर्चेत असते. शहनाज तिच्या पर्सनल आयुष्यातील अपडेट्स सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असते. शहनाजचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. नुकतंच शहनाजने मर्सिडीज कंपनीची नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. ही गुडन्यूज शहनाजने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शहनाजने तिच्या नव्या कोऱ्या मर्सिडीजचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

"स्वप्न पाहण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत...माझ्या कष्टांना आता चार चाकं लागली आहेत. वाहेगुरू तेरा शुकर आ", असं कॅप्शन देत शहनाजने तिच्या नव्या मर्सिडीजची झलक दाखवली आहे. अक्षय्य तृतीयेला गाडी खरेदी करत शहनाजने तिचं आणखी एक स्वप्न पूर्ण केलं आहे.  शहनाजने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत ही १.१२ कोटी इतकी आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :शेहनाझ गिलटिव्ही कलाकार