Join us

'या' लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवल्या हिंदी मालिका; आता कशी दिसते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:02 IST

तिचे फोटो पाहून तिला ओळखणंही कठीण आहे.

'देस मे निकला होगा चाँद', 'परवरीश २', 'डोली सजा के' अशा लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री संगीता घोष (Sangita Ghosh) आठवतेय? एक काळ होता जेव्हा स्टार प्लस या वाहिनीवरील सर्वच मालिका गाजत होत्या. तेव्हाच अभिनेत्री संगीता घोष घराघरात पोहोचली होती. आता संगीताचा लूक कमालीचा बदलला आहे. तिचे फोटो पाहून तिला ओळखणंही कठीण आहे.

संगीता घोषच्या अभिनयाची कायम स्तुती झाली आहे. तिने अनेक भूमिकांमधून अभिनयाची छाप सोडली. 'देस मे निकला होगा चाँद' ही तिची गाजलेली मालिका होती. यात ती पम्मीच्या भूमिकेत दिसली. २००१ ते २००५ मध्ये ही मालिका आली होती. आज मालिकेला २० वर्ष झाली आहेत. आता संगीताचा लूक कमालीचा बदलला आहे. तिचे हे लेटेस्ट इन्स्टाग्राम फोटो पाहून याचा अंदाज येतो. आता ती आधीपेक्षा जास्त हॉट आणि स्टायलिश दिसत आहे. तिचा मॉडर्न अवतार पाहून अनेकांनी तिची स्तुती केली आहे. संगीता 'साझा सिंदूर' या मालिकेत शेवटची दिसली.

संगीताला १९९५ साली आलेल्या 'कुरुक्षेत्र'मुळेही वेगळी ओळख मिळाली. यानंतर तिने 'अजीब दास्तां', 'दरार', 'रिश्ते', 'मेहंदी तेरे नाम की', 'संभव असंभव' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. संगीताने २०११ साली जयपूरचे पोलो खिलाडी राजवी शैलेंद्र सिंह राठोड यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर १० वर्षांनी संगिताला मुलगी झाली. तिचं नाव देवी असं ठेवलं. 

टॅग्स :संगीता घोषटिव्ही कलाकार