Join us

रुबिनाने दिली गुडन्यूज, कुटुंबात दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होणार; पण जुळे नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 15:04 IST

रुबिनाला जुळे होणार नाहीत तरी कुटुंबात 'डबल' आनंदाचं वातावरण

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' ची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) सध्या प्रेग्नंसीचे दिवस एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पती अभिनव शुक्ला आणि कुटुंबासोबत एका बोटीत आराम करतानाचा फोटो पोस्ट केला. तेव्हा बेबी बंप पाहून ती प्रेग्नंट असल्याचं कन्फर्म झालं होतं. तर रुबिनाच्या घरी एक नाही तर दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. रुबिनाची बहीण रोहिणी दिलैकही गरोदर आहे.

रुबिनाने इन्स्टाग्रामवर बहिणीसोबत फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. विमानतळावरील दोन्ही बहिणींचा हा गोड फोटो आहे. याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'आम्ही खूप खूश आहोत कारण आमच्या कुटुंबाचा आनंद दुप्पट झाला आहे. रोहिणी आणि सार्थक आईबाबा होणार आहेत.' तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

रुबिना टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 21 जून 2018 रोजी अभिनव शुक्लासोबत लग्नबंधनात अडकली. दोघंही लवकरच आईबाबा होणार आहेत. तर आता बहिणीनेही आनंदाची बातमी दिल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. रोहिणी दिलैकने यावर्षीच मार्चमध्ये सार्थक त्यागीसह लग्न केले. लग्नानंतर सातच महिन्यात तिने गुडन्यूज दिली आहे.

रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, 'छोटी बहू' या मालिकेतून तिने पदार्पण केलं. तिची 'शक्ति: अस्तित्व' ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली. तर रुबिनाने 'बिग बॉस 14' चे विजेतेपदही पटकावले. लवकरच ती एका पंजाबी सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारगर्भवती महिला