हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री रीम शेख रिलेशनशिप आणि लग्नाबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे. एका पॉडकास्टमध्ये रीमने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न काय प्रेमही करणार नसल्याचं रीमने पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. यामागचं कारणही रीमने सांगितलं आहे.
रीमने शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिला आंतरधर्मीय लग्नाबद्दल विचारण्यात आलं. दुसऱ्या धर्मातील मुलाशी प्रेम झालं तर त्याने तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम होईल का? असा प्रश्न रीमला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रीम म्हणाली, "मी खूप धार्मिक आहे. लोकांना कदाचित हे माहीत नसेल पण मी दिवसातून पाच वेळा नमाज पठण करते. जेव्हा रमजान असतो तेव्हा मी रोजाचा उपवास करते. माझ्या आयुष्यात जर काही वाईट घडत असेल तर मी सगळ्यात आधी खुदाकडे प्रार्थना करते. त्यामुळे माझ्या धर्माव्यतिरिक्त दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत मी आयुष्य काढू शकत नाही. माझ्याकडून हे होणार नाही".
रीमने तुझसे है राबता, तेरे इश्क में घायल, फना- इश्क में मरजावा, चक्रवर्ती अशोक सम्राट, दिया और बाती हम, ना बोले तुम ना मैने कुछ कहा, ये रिश्ता क्या कहलाता है, इश्कबाज या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. होमबाऊंड या सिनेमातही ती झळकली होती. लाफ्टरशेफमध्येही रीम दिसली होती.
Web Summary : Actress Reem Shaikh stated she won't marry outside her religion due to her deep faith. She prays five times daily and observes Ramadan. Her religious beliefs prevent her from marrying someone from another faith.
Web Summary : अभिनेत्री रीम शेख ने कहा कि वह अपने गहरे विश्वास के कारण अपने धर्म से बाहर शादी नहीं करेंगी। वह प्रतिदिन पांच बार नमाज पढ़ती हैं और रमजान का पालन करती हैं। उनकी धार्मिक मान्यताएं उन्हें किसी अन्य धर्म के व्यक्ति से शादी करने से रोकती हैं।