Join us
Daily Top 2Weekly Top 5

ती परत येतेय...! 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, मालिकेत येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:13 IST

'सावळ्याची जणू सावली' दिसणार नवा चेहरा, या अभिनेत्रीची होणार एन्ट्री; प्रोमो पाहिला का?

Television: झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' ही लोकप्रिय मालिका असून या मालिकेत दिवसेंदिवस ट्विस्ट येत आहेत. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेचं कथानक,सावली-सारंगच्या नात्यातील चढ-उतार यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच,  एकीकडे 'सावळ्याची जणू सावली'मालिकेत सावली-सारंगच्या नात्यात दूरावा आल्याचं पाहायला मिळतंय.त्यानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळाली आहे.आता मालिकेत एका नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया.

नुकताच झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर  'सावळ्याची जणू सावली' मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील सुखावले आहेत. पुन्हा एकदा नवं वादळ घेऊन ती परत येतेय...! असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. हातात चाकू घेऊन ती त्यावर बोटे फिरवताना दिसत आहे.शिवाय प्रोमोमध्ये या अभिनेत्रीचा चेहरा अर्धवट दिसत असून तिचे डोळे दाखवण्यात आले आहेत. यावरून प्रेक्षकांनी अचूक हेरलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे पू्र्वा शिंदे असल्याचं बोललं जातंय. लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा शिंदे आता या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, या प्रोमो पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते आणि नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रोमोवर एका नेटकऱ्यांने कमेंट करत लिहिलंय, "Keeeep Rockkinggg पूर्वा...",  तर आणखी एका यूजरने म्हटलंय,"खूप उत्सुक आहे."

वर्कफ्रंट

पूर्वा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने या आधी लागिरं झालं, पारू यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.‘पारू’ मालिकेत तिने दिशा नावाचं नकारात्मक पात्र साकारलं होतं. मात्र,या भूमिकेतूनही तिने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप उमटवली.आता ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत तिच्या येण्याने कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Popular actress enters 'Savalayachi Janu Savli', bringing new twist.

Web Summary : ‘Savalayachi Janu Savli’ sees a twist with Purva Shinde's entry. She is known for roles in 'Lagira Jhala Ji' and 'Paru,' where she played Disha. Her role is expected to bring significant changes to the storyline, intensifying viewer excitement.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया