Join us

१५ वर्षांची असताना बॉयफ्रेंडसोबत पळाली, लग्नाआधीच गरोदर राहिली अन्...; टीव्ही अभिनेत्रीने दोनदा केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:35 IST

अभिनयातील करिअरसोबतच पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. 

हिंदी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूजा बॅनर्जी. देवों के देव महादेव या मालिकेत पार्वती माताची भूमिका साकारून पूजा घराघरात पोहोचली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयातील करिअरसोबतच पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. 

पूजा बॅनर्जी १०वीत शिकत असतानाच एका मुलाच्या प्रेमात पडली होती. त्याच्या प्रेमात ती इतकी वेडी झाली होती की १५ वर्षांची पूजा मागचा पुढचा काहीच विचार न करता आईवडिलांचं घर सोडून बॉयफ्रेंडसोबत मुंबईला पळून आली होती. पण, तिचं हे रिलेशनशिप फार काळ टिकलं नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर पूजा एकटी पडली होती. मात्र तिने परत आईवडिलांच्या घरी न जाता मुंबईतच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पूजाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. 

यादरम्यानच तिची ओळख कुणाल वर्मासोबत झाली. त्या दोघांनी ९ वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न करत एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाआधीच पूजा गरोदर होती. लग्नानंतर ६ महिन्यांनी तिने कृशिव या त्यांच्या लेकाला जन्म दिला होता. लेकाच्या जन्मानंतर पूजाने पुन्हा कुणालसोबत गोवामध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी