Join us

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला झाला कोरोना, म्हणाली- "खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:42 IST

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला कोरोना झाला असून तिने सर्वांना स्वतःची काळजी घेण्याचं आणि आवश्यक ती सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन केलंय.

पुन्हा एकदा भारतात कोरोना होणाऱ्या व्यक्तींमध्ये वाढ होताना दिसतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने तिला कोरोना झाल्याचा खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे जोइता चॅटर्जी. जोइताने 'बालवीर' आणि 'क्लास ऑफ २०२०' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा खुलासा जोइताने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

जोइताने केला कोरोना झाल्याचा खुलासा

जोइताला खोकला आणि सर्दी यांसारखी लक्षणं दिसल्याने तिने चाचणी केली. टेस्ट केल्यानंतर  जोइताचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खबरदारी म्हणून जोइताने स्वतःला आयसोलेट केले असून, कोविडसंबंधी सर्व नियमांचं ती पालन करत आहेत. जोइता चॅटर्जीने सांगितले की, "होय, हे खरं आहे की मी सध्या कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. मात्र, मला विश्वास आहे की मी लवकरच बरी होईन. मी यापूर्वीच लसीकरण केले आहे, त्यामुळे मला वाटते की परिस्थिती लवकरच सामान्य होऊन मी पुन्हा आधीसारखी ठणठणीत होईल."

जोइताला कोरोना झाल्याचं कळताच सेलिब्रिटींनी आणि तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जोइताने फॅन्सचे आभार मानले आणि लवकरच कामावर परतण्याची आशा व्यक्त केली. तसेच, सर्वांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. देशभरात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याने, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. इंडस्ट्रीतील शिल्पा शिरोडकर आणि निकिता दत्ता या दोन अभिनेत्रींना कोरोना झाल्यानंतर जोइताला कोरोनाची लागण झाल्याने सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस