Join us

टीव्ही अभिनेता आशिष कपूरला जामीन मंजूर, दिल्ली पोलिसांनी केलेली अटक; नक्की कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:20 IST

जामीन देताना कोर्ट काय म्हणाले?

टीव्ही अभिनेता आशिष कपूरला (Ashish Kapoor)  बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दिल्लीत एका पार्टीमध्ये ३३ वर्षीय आशिषने बलात्कार केल्याची तक्रार एका २७ वर्षीय महिलेने केली होती. तोवर आशिष दिल्लीतून पुण्याला पळून आला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी पुणे गाठलं आणि आशिषला बेड्या ठोकून घेऊन गेले होते. दरम्यान या प्रकरणी आशिषला आता कोर्टाने जामीन दिल्याचं समोर आलं आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश भूपिंदर सिंह यांनी १० सप्टेंहर रोजी आशिष कपूरला एक लाख रुपयांचा बेल बॉन्ड आणि तितक्याच रोखीचे शेअर बॉन्डच्या आधारावर जामीन दिला. यावेळी कोर्टाने वकिलांचे युक्तिवाद, रेकॉर्ड आणि पुरावे, सीसीटीव्ही फुटेज या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या. पुढील तपासासाठी आशिष कपूर कोठडीत असण्याची गरज नाही असा निर्णय देत त्याला जामीन मंजूर केला आहे.  

कोर्ट म्हणाले, "पोलिसांनी आरोपीची पाच दिवसांची पोलिस कस्टडीची मागमी केली होती. त्यात ४ दिवसांची कोठडी मंजूर झाली होती. रिमांड मिळाली असतानाही पोलिसांनी मोबाईल फोन ताब्यात घेण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत. कायद्यानुसार, कोणतीच तपासणी केली गेली नाही. आरोपीने तपासात सहकार्य केले नाही असाही कुठे उल्लेख नाही." असं सांगत आशिषला जामीन मंजूर करण्यात आला.

आशिष कपूर अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. 'सरस्वतीचंद्र','लव मॅरेज या अरेंज्ड मॅरेज','चांद छुपा बादल मे','ससुराल सिमर का २','सात फेरे सलोनी का सफर','देखा एक ख्वाब','ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांचा समावेश आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारन्यायालय