Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीचा अपघात, पायांना गंभीर दुखापत, फोटो पाहून चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:01 IST

Arjun Bijlani Accident : अर्जुन बिजलानीच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. अर्जुनचा अपघात झाला असून त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

अर्जुन बिजलानी हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच त्याने अँकरिंगही केलेलं आहे. अर्जुन बिजलानीच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. अर्जुनचा अपघात झाला असून त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर पायाचा फोटो शेअर करत अर्जुनने या अपघाताची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

अर्जुन त्याच्या पत्नी आणि लेकासोबत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेला होता. तिथेच त्याच्या हा अपघात झाला आहे. अर्जुनने इन्स्टाग्रामवर दुखापत झालेल्या पायाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या पायांना जखम दिसत असून रक्तबंबाळ झाल्याचंही दिसत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे. पण, असं असूनही अभिनेत्याने मुंबईत येऊन कामाला सुरुवात केली आहे. 

सध्या अर्जुन कलर्स टीव्हीवरील 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये अर्जुन आणि करण कुंद्रा यांची जोडी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. 'मिले जब हम तुम'  या मालिकेमुळे अर्जुन प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने 'इश्क मे मरजावा', 'नागिन', 'परदेस मे है मेरा दिल', 'शक्ती', 'जो बीवी से करे प्यार' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस