Join us

"लग्नानंतरही माझे अनेक रिलेशनशिप होते", बायकोला धोका देत होता अभिनेता, म्हणाला- "तिला कळलं तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:21 IST

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमितने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. लग्नानंतरही पत्नीला धोका दिल्याची कबुली अमितने दिली आहे.

अभिनेता अमित टंडन हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ये है मोहोब्बते, दिल मिल गए अशा मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमितने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यामुळे तो चर्चेत आला आहे. लग्नानंतरही पत्नीला धोका दिल्याची कबुली अमितने दिली आहे. त्यामुळे त्याच्या संसारातही वादळ आल्याचं अमितने सांगितलं. 

अमित टंडनने नुकतीच सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्नानंतर बायकोची फसवणूक केल्याचं त्याने सांगितलं. अमित म्हणाला, "हो मी माझ्या पत्नीला धोका दिला आहे. आता मी काय बोलू. हे सगळं थोडं योग्यरित्या सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण, जे मी केलं आहे ते योग्य नाही. मी लग्नानंतरही अनेक मुलींना डेट केलं आहे. आणि त्या कोणाबरोबरच माझे सिरियस रिलेशनशिप नव्हते. सुरुवातीला माझ्या पत्नीला याबाबत माहीत नव्हतं. पण, जेव्हा तिला याबाबत कळलं तेव्हा तिला धक्का बसला होता". 

"यानंतर आमच्या नात्यात दुरावा आला होता. कधी कधी काही गोष्टी नीट करता येत नाहीत. आमच्या नात्यातला हा दुरावादेखील असाच वाढत गेला. मूल झाल्यावर सगळं ठीक होतं, असं लोक म्हणतात. म्हणूनच आम्ही बाळाचा निर्णय घेतला. पण, त्यानंतरही काही ठीक झालं नाही. मग आम्ही घटस्फोट घ्यायचं ठरवलं. घटस्फोटानंतर आम्ही वेगळं आयुष्य जगत होतो. पण, नंतर पुन्हा आम्ही एकत्र आलो", असंही अमितने सांगितलं. 

अमितने रूबीशी २००७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना जिनाया ही मुलगी आहे. २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते. मात्र घटस्फोटानंतर ६ वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले. २०२३ मध्ये अमित आणि रुबिनाने पुन्हा लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी