Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी सेल्फी काढला अन् नंतर बाटली फेकून मारली, प्रसिद्ध अभिनेत्याला आला चाहत्याचा वाईट अनुभव; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 17:44 IST

टीव्ही अभिनेत्याला चाहत्याने भर रस्त्यात बाटली फेकून मारली अन्..; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनेक अतरंगी चाहत्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, एका टीव्ही अभिनेत्याला मात्र चाहत्याचा विचित्र अनुभव आला आहे. भाग्यलक्ष्मी फेम अभिनेता आकाश चौधरीला एका चाहत्याने वाईट वागणुक दिली आहे. काही चाहते आकाशबरोबर सेल्फी काढत होते. सेल्फी काढून झाल्यानंतर त्यातील एका चाहत्याने आकाशला पाण्याची बाटली फेकून मारली. आकाशबरोबर घडलेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

'विरल भय्यानी' या पापाराझी पेजवरुन आकाशचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत आकाशबरोबर काही चाहते सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फी काढतानात त्यातील एक चाहता हातातील बाटलीने अभिनेत्याला मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा “काय करत आहेस?” असं आकाश त्याला म्हणताना दिसत आहे. आकाश निघून गेल्यानंतर चाहत्याने त्याला हातातील बाटली फेकून मारल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. कॉमेडियन भारती सिंहादेखील हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाली आहे.

दरम्यान, आकाशने अनेक मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. भाग्य लक्ष्मी या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला १० या रिएलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. आकाश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी