दरवर्षी लाखो भाविक उत्तराखंडमधील चार धाम यात्रेला जात असतात. उत्तराखंडमध्ये समुद्रसपाटीपासून ३५८४ मीटर उंचीवर वसलेलं केदारनाथ मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. २ मे रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले असून दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मराठी अभिनेत्यानेही त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत केदारनाथ गाठलं आहे.
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता अमोल नाईक त्याच्या कुटुंबीयांसह उत्तराखंडमध्ये देव दर्शनासाठी गेला आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो त्याने शेअर केले आहेत. अमोलने कुटुंबीयांसह गंगा आरती केली. त्यानंतर त्याने थेट केदारनाथ गाठलं. केदारनाथला गेल्यावर अमोलने तिथले व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अमोल नाईकने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये त्याने बरकत ही भूमिका साकारली होती. 'सुंदरी' या मालिकेतही तो झळकला आहे. स्टार प्लसवरील 'माती से बंधी डोर' या हिंदी मालिकेतही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 'दार उघड बये', 'आई तुळजाभवानी' या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे.