Join us
Daily Top 2Weekly Top 5

ह्या भूमिकेच्या वेशभूषेसाठी तुषार कालियाला लागले तीन तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:57 IST

तुषार कालियाने सादर केलेले शिव तांडव नृत्य हे या दांडिया नाईटसचे एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

ठळक मुद्देतुषार कालियाने केले तांडव नृत्य

नवरात्रीचा उत्सव अगदी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यासाठी स्टार प्लसवरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमाने टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणले आहे. सनाया इराणी, जय भानुशाली आणि किकू सारडा या देशातील तीन अग्रगण्य आणि विनोदी सूत्रसंचालकांकडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देण्यात आले आहे. यात तुषार कालियाने सादर केलेले शिव तांडव नृत्य हे या दांडिया नाईटसचे एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात नृत्य दिग्दर्शनाची संधी मिळालेला आणि आजवर टीव्हीवरील अनेक नृत्य विषयक रिएलिटी कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेला तुषार कालियाने या भागात सादर केलेल्या अफलातून शिवतांडव नृत्याने सर्वजण थक्क झाले. यासंदर्भात तुषार म्हणाला की,“व्यासपीठावर हा माझा पहिलाच नृत्याचा कार्यक्रम होता. पण या शिव तांडव नृत्याची तयारी करताना आणि ते ‘दांडिया नाईटस’च्या व्यासपीठावर सादर करताना मला अतिशय आनंद झाला. या नृत्यासाठी मला शंकरासारखी वेशभूषा करावी लागली होती. तो मी माझा सन्मान समजतो आणि हे नृत्य सादर करताना या वेशभूषेमुळे मला वेगळीच प्रेरणाही मिळाली. पण या वेशभूषेसाठी मला तब्बल तीन तास द्यावे लागले. या नृत्यासाठी माझा पोशाख आणि रंगभूषा अगदी योग्य असावी, यावर निर्मात्यांचा कटाक्ष होता. पणहे नृत्य सादर करताना मला अतिशय आनंद होत होता. प्रेक्षकांनाही हे नृत्य आवडेल, अशी आशा करतो.”तुषारचे हे शिव तांडव नृत्य ही प्रेक्षकांसाठी एक नेत्रसुखद पर्वणी ठरेल आणि त्यांना ते पाहताना खूप आनंद होईल, यात शंका नाही.

टॅग्स :नवरात्री