Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला जपणार आहे' मालिकेतील मीराचा चाहत्यांना सुखद धक्का; 'या' अभिनेत्यासोबत पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:47 IST

'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी आहे कनेक्शन

Actress Mahima Mhatre Engaged: यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली. या यादीत एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव सामील झालं आहे.झी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे या मालिकेतील मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे हिचा  देखील नुकताच साखरपुडा पार पडला. महिमाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

महिमा म्हात्रेचा साखरपुडा नुकताच पार पडला असून तिचा होणारा नवरा देखील मालिकाविश्वात सक्रिय आहे. अभिनेत्रीने लोकप्रिय टीव्ही अभिनेता रोशन विचारेसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.या जोडप्याचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी  तसंच नेटकरी आणि चाहत्यांनी या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

कोण आहे अभिनेत्रीचा नवरा?

रोशन विचारे हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘दार उघड बये’, ‘तुझं माझं जमतंय’ तसेच 'खरंच तिचं काय चुकलं?','स्वराज्य जननी जिजामाता'यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. 

तर महिमा म्हात्रेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तरमहिमा 'तुला जपणार आहे' मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती मीरा हे पात्र साकारते आहे. याशिवाय तिने अन्य काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'खमंग नात्याचा गोडा मसाला', 'दार उघड बये', 'जाऊ नको दूर बाबा', 'आई मायेचं कवच' या मालिकांमध्ये ती दिसली होती. याशिवाय 'आँख मिचोली' या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Mahima Mhatre engaged to actor Roshan Vichare, photos revealed.

Web Summary : Actress Mahima Mhatre, known for 'Tula Japnar Aahe,' is engaged to actor Roshan Vichare. The couple's engagement photos are circulating online, drawing congratulations from fans and celebrities. Roshan has starred in several TV serials.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया