Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अस्सल पाहुणे इसराल नमुने' कार्यक्रमामध्ये तुकाराम मुंढे आणि सयाजी शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 17:01 IST

'अस्सल पाहुणे इसराल नमुने' कार्यक्रमामध्ये सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढेंनी हजेरी लावली आहे.

कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तिमत्व येणार आहेत. कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रम सध्या बराच चर्चेमध्ये आहे कारण या कार्यक्रमामध्ये अनेक नामवंत कलाकार आणि इतर क्षेत्रामधील दिग्गज व्यक्ती त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना सांगतात. तसेच त्यांची दुसरी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळते. या आठवड्यामध्ये मातीशी नाते आणि कामाशी प्रामाणिक अस्सल पाहुण्यांसोबत बेधडक गप्पा रंगणार आहेत. म्हणजेच सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढेंनी कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आलेले अनेक अनुभव, गोष्टी सांगितल्या. 

सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आई बरोबरचे काही किस्से या वेळेस सांगितले. सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे यांना मकरंद यांनी काही प्रश्न देखील विचारले आहेत. सयाजी यांना विचारले कोणाला उभे करण्यासाठी कष्ट घ्यावेत माणूस की झाड ? त्यावर ते म्हणाले झाड. तर तुकाराम यांना विचारले कोणत्या फोनचे टेन्शन येत वर्षा बंगला की अर्चना वहिनींच्या ? याच उत्तर प्रेक्षकांना कार्यक्रमामध्ये मिळेल. तुकाराम मुंढे यांनी खंत देखील व्यक्त केली कि, माझ्यासारखे १० अधिकारी तयार होऊ शकतील पण माझा हा प्रश्न आहे की, तुम्ही एक अधिकारी टिकवू शकत नाहीत तर १० अधिकारी कसे तयार होतील ? १० नव्हे तर शंभर अधिकारी कसे तयार होऊ शकतील याचा खुलासा देखील त्यांनी यावेळेस केला. सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेल्या “वनराई” उपक्रमाच्या प्रवासाबद्दल सांगितले आणि झाड आणि पर्यावरणाविषयी असलेल्या प्रेम देखील व्यक्त करत त्यांनी लोकांना आव्हान केले की प्रत्येकाने एक झाड लावा आणि ते जगवा.मनाला चटका लावून जाणारा अनुभव तुकाराम मुंढेनी सांगितला. २००६ रोजी शिकाऊ जल्हाधिकारी म्हणून वाशी नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागामध्ये कार्यरत असताना जवळपास १५०० अतिक्रमण काढले आणि त्यावेळेसच मनाची घालमेल करणारा प्रसंग समोर आला. काय निर्णय घ्यावा कळत नव्हते. परंतु मी असे म्हणेन की तो प्रसंग माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. काय होता तो प्रसंग ? काय घडले होते त्यावेळेस ?  याबद्दल अस्सल पाहुणे इरसाल नमुनेचा हा विशेष भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर जाणून घेता येणार आहे.

टॅग्स :अस्सल पाहुणे इसराल नमुनेतुकाराम मुंढेसय्याजी शिंदेमकरंद अनासपुरेकलर्स मराठी