Join us

VIDEO : ‘फुलावर फिरत असतो भुंगा...’, पाठक बाईंनी राणादासाठी घेतला खास उखाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:17 IST

Akshaya Deodhar, Hardeek Joshi : होय, लग्नाआधीच पाठक बाईंनी अर्थात अक्षया देवधरनं उखाण्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ ( Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी  ( Hardeek Joshi)  व अक्षया देवधर ( Akshaya Deodhar) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.  त्याआधी दोघांनीही आपल्या नात्याची भणकही कुणाला लागू दिली नव्हती. अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चयार्चा धक्का बसला होता.  आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या जोडप्याच्या लग्नाची. तर लगीनघाई सुरू झाली आहे. किमान अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओवरून तरी हेच वाटतंय. होय, लग्नाआधीच पाठक बाईंनी अर्थात अक्षया देवधरनं उखाण्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे.

होय, अक्षयाने तासाभरापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मस्तपैकी उखाणा घेताना दिसतेय. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.अलीकडे अक्षयानं एका फॅमिली प्रोगामला हजेरी लावली होती. तेव्हा सर्वांच्या आग्रहाखातर अक्षयानं लाजत मुरडत हार्दिकसाठी खास उखाणा घेतला. ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, हार्दिक रावांच नाव घेते कारण तो आहे माझा होणारा नवरा,’ असा तिचा उखाणा ऐकून सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं..   या व्हिडीओत अक्षया जांभळ्या रंगाच्या साडीत दिसतेय. या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. लय भारी अंजलीबाई... व्वा व्वा जमलंय, जमलंय...,अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पुण्यात त्याचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. नुकतंच दोघांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा लग्न कधी आणि कुठे करणार असा प्रश्न विचारल्यानंतर  दोघेही पुण्यात लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लग्नाची तारीख मात्र अद्या गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीटेलिव्हिजन