Marathi Tv Actor: मनोरंजन विश्वातून दु:खद माहिती समोर आली आहे. मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता, तू ही रे माझा मितवा फेम अभिनेता शेखर फडकेच्या वडिलांचं निधन झालं आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी शेअर केली आहे. विजयकुमार फडके असं शेखरच्या वडिलांचं नाव आहे. वडिलांच्या अचानक जाण्यानं फडके कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. शेखरनं इन्स्टाग्रावर वडिलांच्या निधनाची माहिती देत अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे.अभिनेत्याची ही पोस्ट पाहून चाहतेही हळहळले आहेत.
अभिनेता शेखर फडकेने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, दुःखद बातमी.. आज दिनांक 6 एप्रिल रोजी,माझ्या बाबांना,विजयकुमार फडके यांना पहाटे 2 वाजता देवाज्ञा झाली...बाबा 76 वर्षांचे होते...आणि आजच त्यांचा वाढदिवस होता (6 एप्रिल 1949- 6 एप्रिल 2026)त्यांच्या पुढच्या प्रवासा साठी, तुमची प्रार्थना उपयोगाची पडणार, यासाठी तुम्हाला कळवत आहे....( मी शेखर फडकेआणि माझा भाऊ शिरीष फडके आणि परिवार )...अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या वडिलांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.
शेखर फडके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक गाजलेले चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत काम करतोय. मालिकेतील त्याची अविनाश नावाची भूमिका प्रेक्षकांना आवडतेय.
Web Summary : Marathi actor Shekhar Phadke's father, Vijaykumar Phadke, passed away on his birthday. Shekhar shared the news on social media, expressing his grief. The actor's fans and the Marathi entertainment industry are offering condolences. He is known for 'Tu Hi Re Majha Mitwa'.
Web Summary : मराठी अभिनेता शेखर फडके के पिता, विजयकुमार फडके, का उनके जन्मदिन पर निधन हो गया। शेखर ने सोशल मीडिया पर दुख व्यक्त किया। 'तू ही रे माझा मितवा' अभिनेता के प्रशंसकों और मराठी मनोरंजन जगत ने शोक व्यक्त किया।