बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बिग बॉस सदस्यांवर आगळावेगळा टास्क सोपवणार आहेत. ज्यामध्ये सदस्यांना बिग बॉसच्या घोषणेनंतर स्टेट्स व्हायचे आहे आणि त्यांची रिलीझ ही सूचना होताच रिलीझ व्हायचे आहे. टास्क दरम्यान बर्याच गंमती होणार हे नक्की... कारण बिग बॉस कधीही या दोन सूचना देऊ शकतात. पण, या मागचा हेतु काय असावा ? या सूचना येताच सदस्यांना असेल त्या परिस्थितीमध्ये थांबायचे आहे आणि रिलीझ ही सूचना येताच हालचाल करणे अपेक्षित आहे. आता बघूया घरातील सदस्य ही संयमाची आणि अवघड कसोटी कशी यशस्वीरित्या पार पाडतील?
काल अभिजीत केळकर आणि आरोहमध्ये रंगलेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये अभिजीत केळकरने बाजी मारून १० व्या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. या टास्कमध्ये बरीच वादावादी झाली, भांडण झाली, गैरसमज झाले पण अखेर घरातील सदस्यांनी हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले. आजच्या टास्कमध्ये काय घडणार ? सदस्यांना बिग बॉस कोणते सरप्राइज देणार ? हे बघणे रंजक असणार आहे.