Join us
Daily Top 2Weekly Top 5

संसारात रमली तितीक्षा; नवऱ्यासाठी केला खास मालवणी जेवणाचा बेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 10:57 IST

Titeekshaa tawde: सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तितीक्षाचं कौतुक केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे (titeeksha tawde). 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फ्रेम तितीक्षाने नुकतीच सिद्धार्थ बोडकेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे ही जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्येच तितीक्षाने लग्नानंतर सिद्धार्थसाठी चक्क मालवणी जेवणाचा बेत केला. सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.

सिद्धार्थने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच्या जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तितीक्षाने त्याच्यासाठी खास जेवणाचा बेत केल्याचं दिसून येत आहे. शुटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत तितीक्षाने सिद्धार्थसाठी खास मालवणी पद्धतीचं नॉन व्हेज जेवण केलं.

सिद्धार्थने हा फोटो शेअर करत 'धन्यवाद बायको' असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच बॅकग्राऊंडला 'कोकण कोकण' हे गाणं सुद्धा प्ले केलं आहे. तितीक्षा कोकणातली असल्यामुळे तिने हा खास स्वयंपाक केला होता. सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत झळकत आहे. तर, सिद्धार्थ 'जेएनयू' या सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनतितिक्षा तावडेटिव्ही कलाकार