Team India Players Support Malti Chahar : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' आता त्याच्या अंतिम टप्प्यावर आला आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. सध्या 'बिग बॉस'च्या घरात केवळ ८ स्पर्धक शिल्लक आहेत. ज्यात गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट, तान्या मित्तल, अशनूर कौर, मालती चाहर, शहबाज बदेशा आणि प्रणीत मोरे यांचा समावेश आहे. आता या आठपैकी कोण 'बिग बॉस १९' च्या ट्रॉफीपर्यंत पोहोचणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्या लाडक्या स्पर्धकासाठी चाहते जिओ हॉटस्टारवर वोटिंग करत आहेत. अशातच आता 'बिग बॉस'चा पुर्ण खेळ अधिक रंगतदार झाल्याचं दिसतंय. कारण, 'बिग बॉस'च्या एका स्पर्धकासाठी लोकप्रिय क्रिकेटपटू एकवटले आहेत.
'बिग बॉस १९'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या मालती चहरच्या समर्थनार्थ भारतीय क्रिकेट संघातील अनेक दिग्गज खेळाडू मैदानात उतरले आहेत. युजवेंद्र चहल, सुरेश रैना, अर्शदीप सिंग, खलील अहमद, तिलक वर्मा, शिवम दुबे यांच्यासह इतर प्रमुख खेळाडूंनी मालतीला पाठिंबा दिला आहे. या क्रिकेटपटूंनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर करत मालतीला मतदान करण्याचं चाहत्यांना आवाहन केले आहे.
क्रिकेट जगतातील इतक्या मोठ्या खेळाडूंनी एकत्र येऊन मालतीला पाठिंबा दिल्यानं आता वोटिंग ट्रेण्डमध्ये मोठं उलटफेर झाल्याचं दिसू शकतं. विशेष म्हणजे मालतीसाठी याआधी लोकप्रिय युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी' विजेता एल्विश यादवनं वोट अपील केलं होतं. क्रिकेटपटूंची एवढी मोठी ताकद मालतीच्या पाठीशी उभी असताना, ती आता अंतिम फेरीत किती पुढे जाते आणि बिग बॉसची ट्रॉफी उचलू शकते का, हे पाहणे तिच्या चाहत्यांसाठी खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे.
Web Summary : Indian cricketers, including Raina, Chahal, and Arshdeep, are supporting Malti Chahar in Bigg Boss 19. They appealed to fans to vote, potentially influencing the final outcome. Elvish Yadav also supports Chahar.
Web Summary : सुरेश रैना, चहल, अर्शदीप सहित भारतीय क्रिकेटरों ने 'बिग बॉस 19' में मालती चाहर का समर्थन किया। उन्होंने प्रशंसकों से वोट करने की अपील की, जिससे अंतिम परिणाम प्रभावित हो सकता है। एल्विश यादव ने भी चाहर का समर्थन किया।