Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘लग्नाची बेडी’ मालिकेत दिसणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील हा लोकप्रिय चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:22 IST

लेक माझी लाडकी (Lek Mazhi Ladki), जुळून येती रेशीमगाठी सारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिकांची रेलचेल सुरु आहे. मात्र, या मालिकांच्या गर्दीत अशा मोजक्याच मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागतात. स्टार प्रवाह वाहिनीवर ३१ जानेवारीपासून दुपारी १ वाजता भेटीला येतेय नवी मालिका ‘लग्नाची बेडी’.

अभिनेत्री सायली देवधर (Sayali Deodhar ) या मालिकेत सिंधू सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे. लेक माझी लाडकी, जुळून येती रेशीमगाठी सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सायलीने पुण्यातील अभिनव कला केंद्र या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यातील एका ग्रुपसोबत नाटक करता करता ती अभिनयक्षेत्रात आली आणि इथेच रमली.

सिंधू सावंतच्या भूमिकेविषयी सांगताना सायली म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. याआधी स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकी या मालिकेतून मी भेटीला आले होते. त्यामुळे ही मालिका करताना माहेरी आल्याचं फिलिंग आहे. सिंधू ही कोकणात वाढलेली मुलगी आहे. लहानश्या गावात वाढुनही तिची शिकण्याची इच्छा प्रबळ आहे. तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे. डॉक्टर झाल्यानंतरही गावातल्या लोकांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे.

महत्त्वाकांक्षी आणि खंबीर असं हे पात्र आहे. कुठल्याही परिस्थितीत ठामपणे उभी रहाणारी आणि स्वत:ची मतं मांडणारी अशी ही सिंधू. सिंधूचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. त्यांची ती मनापासून सेवा करते. मात्र नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी आहे. वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सिंधूला तिच्या वडिलांना गमवावं लागतं. यामागे नेमकं कोणतं कारण दडलं आहे हे मालिकेतून उलगडेल. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह